विदेशातून आलेल्या ३ रुग्णांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे आढळले असून गोवा सरकार त्यामुळे खडबडून जागे झाले आहे. २५. २९ व ५५ वयाचे हे पुरुष रुग्ण असून स्पेन ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतून आलेले होते. त्यांच्या संपर्कात आणखी किती लोक आले याचा आता शोध घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा केला आहे
नवप्रभेला काल या संदर्भात माहिती मिळाली तेव्हा आम्ही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याशी संपर्क साधला परंतु तेव्हा त्याला दुजोरा देणे त्यांनी टाळले होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी ट्वीटर वर तशी कबुली दिली आहे.
राज्यात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य खात्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे या वृत्तास दुजोरा दिला आहे. या रुग्णांचे वैद्यकीय नमुने मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते ते सकारात्मक आल्याने सरकारचे धाबे दणाणले आहे.