इडीएममुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळत असून असे संगीत महोत्सव राज्यात वर्षातून दोनदा आयोजित करायला हवेत, असे मत घन कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी काल व्यक्त केले.
गोव्यात इडीएम डिसेंबर व एप्रिल अशा प्रकारे दोनदा आयोजित करणे शक्य असल्याचे मत लोबो यांनी व्यक्त केले. इडीएमसाठी मोठ्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक राज्यात येत असतात. त्यामुळे अशा संगीत महोत्सवाचे वर्षाला दोनदा आयोजन केल्यास त्याचा राज्याला फायदाच होणार असल्याचे लोबो म्हणाले.
इडीएम आयोजक सरकारचे पैसे देणे बाकी असल्याचे पत्रकारांनी त्यांच्या नजरेस आणून दिले असता ते म्हणाले की, गोवा पोलीस तीन तीन पाळ्यांमध्ये काम करण्यासाठीचे पैसे घेतात. त्यांनी दोन पाळ्यांसाठीचेच पैसे घ्यायला हवे असल्याचे लोबो म्हणाले.