चरसची तस्करी करणाऱ्या दोन गोमंतकीयांसह एकूण तिघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांचा 3.68 किलो चरस जप्त करण्यात आला. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आयोजित पार्ट्यांमध्ये या ड्रग्सचा नियोजित पुरवठा करण्यात येणार होता अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. यात अटक केलेल्या चौहान याने पोलिसांना गोवास्थित दोन पोर्तुगीज नागरिक अन्य पर्यटकांना ड्रग्सचा पुरवठा करायचे. चौहान हा स्वतः ड्रग्सच्या आहारी गेलेला व्यक्ती असून तो हिमाचल येथून ड्रग्स घेऊन गोव्यात येत होता. दर किलोमागे त्याला 50 हजार रुपये मोबदला दिला जायचा. गेल्या सप्टेंबरपासून तो हे काम करत होता अशी माहिती दिली. या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी फर्नांडिस आणि फुर्तादो या पोर्तुगीज नागरिकांना अटक केली.