गोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई

0
11

>> महाराष्ट्राच्या अबकारी मंत्र्यांचा इशारा

गोव्यातून महाराष्ट्र राज्यात बेकायदा मद्याची वाहतूक करण्याच्या कामात गुंतलेल्या गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हा कायद्यातील विविध कलमाखाली कडक कारवाई केली जाणार आहे, असे महाराष्ट्र राज्याचे अबकारी मंत्री शंभुराज देसाई यानी काल सांगितले. मंत्री श्री. देसाई यांनी यासंबंधी कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अबकारी अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

गोवा व महाराष्ट्राला सिंधुदुर्ग जिल्ह्याने जोडणारे जे छोटे मार्ग आहेत तेथील सीमेवर हलवता येतील अशी कार्यालये थाटून त्यांचा तपासणी केंद्रे म्हणून वापर केला जावा, अशी सूचना त्यांनी अबकारी अधिकार्‍यांना केली आहे.

गोव्यातील मद्य विक्रेते महाराष्ट्रात मद्य नेण्यास जे परवाने देत असतात त्यांना काहीच अर्थ नाही. आणि कायद्यानुसार गोव्यातून कुणीही महाराष्ट्रात मद्य नेऊ शकत नसल्याचे महाराष्ट्रातील अबकारी अधिकार्‍यांनी म्हटले आहे.