गोव्यातील वारकरी महिलेचा सोलापूरमध्ये अपघाती मृत्यू

0
8

यंदाच्या आषाढी एकादशीला विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गोव्यातून हजारो वारकरी पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्यातीलच कोलवाळ येथील एका वारकरी महिलेचा काल सोलापूर महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. गौरी कुडतरकर असे या मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर माहितीनुसार, गौरी कुडतकर यांनी अन्य वारकऱ्यांसह 2 जुलै रोजी अस्नोडा येथून पंढरपूरला प्रस्थान केले होते. काल सकाळी वारीत पायी चालताना गौरी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना वॅगनर कारमधून नेले जात होते. दुपारी पावणेबाराच्या सुमारास सोलापूर मार्गावर एका इनोव्हा कारने वॅगनर कारला धडक दिली. त्यात गौरी कुडतकर ह्या जागीच ठार झाल्या, तर अन्य दोघेजण जखमी झाले. या अपघातानंतर इनोव्हा कारचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.