गोव्यातील जीसीईटी प्रवेश परीक्षा लांबणीवर

0
248

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गोवा तंत्रशिक्षण संचालनालयाने  नियोजित गोवा समान प्रवेश परीक्षा (जीसीईटी) पुढे ढकलली आहे. आता ही जीसीईटी परीक्षा जून महिना किंवा नंतर घेतली जाणार आहे. या परीक्षेची तारीख १० दिवस अगोदर जाहीर केली जाणार आहे.

गोवा तंत्रशिक्षण संचालनालयाने दि. ५ आणि ६ मे २०२० रोजी जीसीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. परंतु, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर ही परीक्षा घेणे शक्य नसल्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीईई आणि एनईईटी परीक्षांच्या दरम्यान जीसीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. कोविड१९ च्या पार्श्‍वभूमीवर जाहीर केलेल्या विविध प्रवेश प्रक्रियेत दुरुस्ती केली जाणार असून प्रवेश प्रक्रियेबाबत नव्याने आदेश जारी केले जाणार आहेत.