गोव्यातील मेरी माटी, मेरा देश अंतर्गत कलश यात्रा नवी दिल्ली येथे काल पोहोचली आहे. नवी दिल्ली येथे 30 व 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील मेरी माटी, मेरा देश कार्यक्रमात गोव्यातील कलश सहभागी होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत येथील आझाद मैदानावर 12 तालुक्यातील माती संकलित करून कलश पूजन केल्ानंतर कलश यात्रा नवी दिल्लीला रेल्वे मार्गाने रवाना झाली होती.
देशातील 36 राज्य आणि संघप्रदेशातील कलश या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 30 रोजी नवी दिल्ली येथे मेरी माटी मेरा देश अर्तंगत दिवसभर कार्यक्रम होणार आहे. यात विविध राज्यातील कलश एका ठिकाणी आणण्यात येणार आहेत. तसेच, 31 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी विजय चौक येथे होणाऱ्या कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.