गोवा बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनने (जीबीबीएफए) मडगाव येथील मॅक्सन हब येथे चाचणी घेत खेळाडूंची निवड केली आहे. बेळगाव येथे १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार्या सतीश शुगर्स क्लासिक बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी तसेच पुढील वर्षी पटणा बिहार येथे २७ व २८ जानेवारीला होणार्या फेडरेशन चषकासाठी या खेळाडूंना निवडण्यात आले आहे. निवडण्यात आलेले बॉडीबिल्डर्स ः शुभम गावस, सतीश कुंकळकर, ज्योकिम रॉड्रिगीस, गुरु नार्वेकर, लक्ष्मीदास भोमकर, युसूफ शेख, सय्यद अली खान, किरण आचार्य, सागर. बी. के., प्रमोद नाईक, रोहितेश मांजरेकर, रोहित नाईक, विष्णू उस्कैकर, अभिजित शिरोडकर, अमित तळेकर व जोएल गोन्साल्विस, अश्वेश शेट्ये (फिजिक फिटनेस), सुनील मंडोतरा (फिजिक फिटनेस), नीहार शहा (फिजिक फिटनेस), अब्दुल रफिक (शारीरिकदृष्ट्या अपंग).