गोव्याच्या वरिष्ठ पुरुष आणि महिला संघांनी पुदुचेरी येथे नुकत्याच झालेल्या विभाग १ राष्ट्रीय एकात्मता रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक प्राप्त केले.
भारतीय रस्सीखेच महासंघाच्या सहकार्याने भारताच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयातर्फे एक भारत श्रेष्ठ भारत मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोव्याच्या पुरुष संघाने अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप संघावर मात करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. परंतु पंजाब आणि आंध्र प्रदेशकडून त्यांना पंजाब आणि आंध्र प्रदेशकडून पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या विभागात झारखंडच्या साथीत खेळताना राजस्थान आणि आसामविरुद्धचा सामना जिंकला. परंतु अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपविरुद्धची लढत गमावावी लागल्याने त्यांना कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. गोव्याच्या पुरुष संघात साहील पळ (कर्णधार), मिहिर नार्वेकर, सौरभ पोखरे, गौतम गाड, वरुण गावकर, वरुण नाईक व निखिल चोडणकर (प्रशिक्षक) यांचा समावेश होता. तर महिला संघात भक्ती ताम्हणकर (कर्णधार), आल्फिया बेपारी, पूजा साईनी, ऐश्वर्या गडेकर, ऐश्वर्या चांदेलकर, ईशा नेसवणकर, तनुजा वायंगणकर आणि निखिल चोडणकर (प्रशिक्षक) यांचा समावेश होता.