>> कर्नल सी. के. नायडू क्रिकेट
सांगे क्रिकेट अकादमीच्या मैदानावर कालपासून सुरू झालेल्या कर्नल सी. के. नायडू क्रिकेट लढतीत गोव्याने काल पहिल्या दिवशी सर्व गडी गमावत २०८ धावा बनविल्या. प्रत्युत्तरात खेळताना जम्मू व काश्मीरने दिवसअखेरपर्यंत २ गड्यांच्या मोबदल्यात ६२ धावा बनविल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना गोव्याने शिवम आमोणकर व मंथन खुटकर यांच्या विकेट गमावल्या. परंतु डावखुरा सलामीवीर ईशान गडेकरने एक बाजू लढवित ९ चौकारांसह ८७ धावांची अर्धशतकी खेळी केल्याने गोव्याला दोनशेच्या पार जाता आले. सर्वांत शेवटी बाद झालेल्या ईशानने आदित्य सूर्यवंशीसमवेत चौथ्या विकेटसाठी ७४ तर सातव्या विकेटसाठी दीपराज गावकरसमवेत ५४ धावांची भागीदारी केली. जम्मू व काश्मीरकडून कर्णधार तथा लेगस्पिनर विवरांत शर्माने ५ बडी बाद केले.
प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू व काश्मीरने २ गड्यांच्या मोबदल्यात ६२ धावा बनविल्या होत्या. विवरांत शर्मा (२१) व मुसैफ अजाज (१९) हे दोघे नाबाद खेळत होते.
संक्षिप्त धावफलक ः गोवा पहिला डाव, सर्वबा २०८, (ईशान गडेकर ८७, कौशल हट्टंगडी १९, आदित्य सूर्यवंशी ३२, दीपराज गावकर ३६ धावा. विवरांत शर्मा ५-२८, लोन नासीर मुझफ्फर ३-३८, सुनील शर्मा व त्राग झहीर नझीर प्रत्येकी १ बळी), जम्मू व काश्मीर पहिला डाव, २ बाद ६२, (विवरांत शर्मा खेळत आहे २१, मुसैफ एजाज खेळत आहे नाबाद १९ धावा. निहाल सुर्लकर व दीपराज गावकर प्रत्येकी १ बळी).