गोव्याचा शैक्षणिक हब म्हणून विकास करणार

0
150

>> मुख्यमंत्री ः दोनापावलमध्ये पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन

गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य केंद्र लवकरच सुरू केले जाणार आहे, गोवा राज्याचा शैक्षणिक हब म्हणून विकास करण्याचा मानस आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना दोनापावल येथे काल दिली.

या कार्यक्रमाला विज्ञान तंत्रज्ञानमंत्री मायकल लोबो, डॉ. के. विजय राघवन, मुख्य सचिव परिमल राय, एमआयओचे सुनील सिंग, सचिव दौलत हवालदार, जुझे नोरोन्हा यांची उपस्थिती होती. काकोडा येथील नवीन १०० टन क्षमतेच्या अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते १३ डिसेंबरला केली जाणार आहे, असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

द लिजंड पुस्तकाचे प्रकाशन
या विज्ञान महोत्सवात दिवंगत पर्रीकर यांच्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या द लिजंड या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवात पहिले पुष्प बंगलोर येथील पद्मश्री डॉ. अजयकुमार सूद यांनी गुंफले. सुरुवातीला दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित लघुपट दाखविण्यात आला.