गोव्याचा मेघालयवर १८४ धावांनी विजय

0
133

येथील स्लिम्स क्रिकेट मैदानावर काल शुक्रवारी झालेल्या विनू मांकड एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील लढतीत गोव्याने विजयी सलामी देताना दुबळ्या मेघालय संघाचा १८४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना २४६ धावा फलकावर लगावल्यानंतर गोव्याने मेघालयचा डाव २०.३ षटकांत ६२ धावांत संपवला. गोव्याकडून गौरेश कांबळी याने अर्धशतक झळकावताना ५६ धावांचे योगदान दिले. १० चौकारांसह त्याने आपली खेळी सजवली. कर्णदार राहुल मेहता व उदित यादव यांचे अपयश वगळता इतर प्रमुख खेळाडूंनी उपयुक्त योगदान दिले. गोव्याच्या गोलंदाजांनी यानंतर प्रभावी मारा करताना मेघालयची कमकुवत फलंदाजी फळी कापून काढली. गोव्याचा पुढील सामना ८ रोजी अरुणाचल प्रदेशशी होणार आहे.

धावफलक
गोवा ः राहुल मेहता पायचीत गो. गुप्ता ५, गौरेश कांबळी यष्टिचीत थापा गो. आर्यन ५६, उदित यादव झे. व गो. गुप्ता ८, कौशल हट्टंगडी धावबाद ३०, आयुष वेर्लेकर झे. बिबेक गो. आर्यन ४१, मोहित रेडकर धावबाद २९, पीयुष यादव धावबाद २४, ऋत्विक नाईक नाबाद २५, शुभम तारी नाबाद ५, अवांतर २३, एकूण ५० षटकांत ७ बाद २४६
गोलंदाजीः अभिषेक १०-१-५९-०, गुप्ता ७-१-२५-२, राजपूत १०-१-२३-०, स्वस्तिक १-०-१२-०, आर्यन १०-०-६१-२, छमछम ८-१-४०-०, अमनकुमार ४-०-१९-०
मेघालय ः ऋतिक शर्मा पायचीत गो. ऋत्विक नाईक ०, चिराग झे. मोहित गो. ऋत्विक ८, अमनकुमार झे. पीयुष गो. तारी ९, आशिफ खान झे. आयुष गो. ऋत्विक २, दिव्यांश राजपूत त्रि. गो. जेठाजी २१, स्वस्तिक त्रि. गो. जेठाजी ४, गुप्ता पायचीत गो. जेठाजी ०, थापा झे. उदित गो. शादाब ९, आर्यन त्रि. गो. जेठाजी ०, छमछम नाबाद ०, अभिषेक झे. मोहित गो. शादाब ०, अवांतर ९, एकूण २०.४ षटकांत सर्वबाद ६२
गोलंदाजी ः ऋत्विक नाईक ७-१-१९-३, शुभम तारी ७-१-२०-१, हर्ष जेठाजी ४-२-५-४, शादाब खान २.४-०-१६-२