गोविंद गावडेंनी केला भाजप प्रवेशाचा इन्कार

0
17

कॉंग्रेस नेते रवी नाईक यांच्या पाठोपाठ प्रियोळ मतदारसंघातील अपक्षे नेते व कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त काल समाज माध्यमावरुन व्हायरल झाले.

मात्र, मंत्री गोविंद गावडे यांनी स्वतःच या वृत्ताचा इन्कार केला. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त हे खोटे, निराधार व दिशाभूल करणारे आहे व लोकांनी या वृत्तावर विश्‍वास ठेवू नये, असा खुलासा गावडे यांनी नंतर केला.

काही लोकांना अफवा पसरविण्यात आनंद मिळत असतो, असे सांगून लोकांना अशा खोट्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.