>> पर्यटनमंत्र्यांची माहिती
राज्याच्या ग्रामीण भागात विशेषत: हॉस्पिटॅलिटी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गोवा होम स्टे धोरण आगामी १५ दिवसांत जाहीर केले जाईल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
गोवा पर्यटन विभाग आणि एअरबीएनबी यांच्यात ‘रिडिस्कव्हर गोवा’ या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर पर्यटनमंत्री खंवटे बोलत होते.
पर्यटन खात्याचे होम स्टे धोरण तयार करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. आगामी पंधरवड्यात हे धोरण जाहीर केले जाऊ शकते. हे धोरण होम स्टे स्थापन करण्यास इच्छुक असलेल्यांना प्रोत्साहन देणारे आहे. या धोरणामुळे विशेषतः: ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्याची संधी मिळणार आहे, असेही खंवटे म्हणाले.