गोवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

0
12

गोवा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के एवढी वाढ जाहीर केली आहे. ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2024 पासून थकबाकीसह ही वाढ देण्यात येणार आहे. मूळ वेतनावर महागाई भत्ता हा आता 50 टक्क्यांवरून 53 टक्के एवढा करण्यात आला आला आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 21 ऑक्टोबर 2024 पासून वाढ केली होती. तेवढीच वाढ आपल्या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.