गोवा संतोष ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दाखल

0
19

गोव्याने पिछाडीवरून मणिपूरचा 2-1 असा पराभव करताना संतोष करंडकासाठीच्या 77व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची गोव्याची ही 14वी वेळ ठरली. 18व्या मिनिटाला मणिपूरने आघाडी घेतल्यानंतर नेसियो फर्नांडिस याने भरपाई वेळेत (90 + 6 व 116वे मिनिट) याने दोन गोल लगावत गोव्याला विजेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवून दिले. रविवारी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत गोव्याचा सामना सेनादलशी होणार आहे.