गोवा वेल्हा येथे एक-दोन महिन्यांपूर्वी खुला करण्यात आलेल्या नव्या बगल मार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात कारचालक अरफान खान (रा. न्यूवाडे-वास्को) हा जागीच ठार झाला.
अपघातात ठार झालेला स्वीफ्ट कारचा चालक हा पणजीहून वास्कोच्या दिशेने जात होता. गोवा वेल्हा येथे उड्डाण पूल संपल्यानंतर बगल रस्त्याच्या ठिकाणी स्वीफ्ट कारच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी घसरून दुभाजकावर जाऊन आदळली व पणजीकडे येणार्या रस्त्यावर गेली. त्याचवेळी समोरून येणार्या जीपला या कारची जोरदार धडक बसली. या अपघातात स्वीफ्ट कारचालक अरफान खान हा गंभीर जखमी झाल्याने तो जागीच ठार झाला.