गोवा विद्यापीठात पूर्णवेळ समुपदेशक नेमा

0
9

उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव व नैराश्य येण्याच्या घटना वाढू लागलेल्या असून, या पार्श्‍वभूमीवर गोवा विद्यापीठात पूर्णवेळ समुपदेशकांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी काल एनएसयुआयने एका निवेदनाद्वारे उच्च शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक कौस्तुभ कामत यांच्याकडे केली. गोवा विद्यापीठात सुमारे दोन हजार विद्यार्थी आहेत. मात्र, विद्यापीठात पूर्णवेळ समुपदेशक नाहीत. सध्या जे अर्धवेळ समुपदेशक आहेत, ते केवळ आठवड्यातून दोनदाच विद्यापीठाला भेट देत असतात, अशी माहिती एनएसयुआयने कामत यांना दिली. हे अर्धवेळ समुपदेशक दोन हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन कसे काय करू शकतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोविड महामारीनंतर अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडलेले असून, त्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे, ही बाब एनएसयुआयने कामत यांच्या नजरेस आणून दिली.