गोवा विद्यापीठाची ऑफलाइन परीक्षा लांबणीवर

0
15

गोवा विद्यापीठाने राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवार १४ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार्‍या सर्व ऑफलाइन परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे ढकलल्या असून परीक्षा ७ फेब्रुवारी २०२२ पासून घेतली जाणार आहे. विद्यापीठाने यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. एनएसयूआय गोवा या विद्यार्थी संघटनेकडून कोविड रूग्णवाढीमुळे ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या संघटनेने राज्यपालांना परीक्षेसंबंधी एक निवेदनसुद्धा सादर केले.