>> दोन वर्षांनतर रेल्वेसेवा होणार प्रारंभ; ख्रिस्ती भाविकांत समाधान
ख्रिस्ती धर्मिंयांचे तीर्थक्षेत्र असलेल्या वालंकिणीला जाणार्या गोवा-वालंकिणी रेल्वेगाड्या येत्या ७ मार्चपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दक्षिण-पश्चिम रेल्वेने घेतला आहे. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर या रेल्वेगाड्यांची सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मागील सुमारे दोन वर्षे गोव्यातील ख्रिस्ती बांधवाना वालंकिणीला जाता आले नव्हते.
कोरोनाचे संकट टळल्यानंतर गोवा-वालंकिणी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय दक्षिण-पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार १७३१५ या क्रमाकांची वास्को द गामा-वालंकिणी हे रेल्वेगाडी येत्या ७ मार्चपासून दर सोमवारी सकाळी ९ वाजता वास्को येथून वालंकिणी येथे जाण्यासाठी रवाना होईल. ही रेल्वेगाडी दुसर्या दिवशी रात्री १२.२५ ला वालंकिणी येथे पोहोचेल. वालंकिणी येथून वास्कोला येण्यासाठी १७३१६ ही रेल्वेगाडी दर मंगळवारी रात्री ११.४५ वाजता तेथून सुटेल. दर मंगळवारी वालंकिणी येथून वास्कोला येणारी रेल्वेगाडी मंगळवार दि. ८ मार्चपासून सुरू होईल. ही रेल्वेगाडी गुरुवारी पहाटे ३.२५ वाजता वास्को येथे पोहोचेल.
वास्को येथून वालंकिणीला सुटणारी रेल्वे मडगाव, सावर्डे, कुळे, कॅसरव्हॉल, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, राणीबेनुर, बिरुर, आर्सीकेरी, तिपनूर, तुमाकूल, चिकबनावर, बाणस्वाडी, कृष्णराजापुरम, बांगरपेट, सालेम, इरोड, कारुर, थिरुचिरापल्ली, तंजावूर, थिरुवरुर, नागापट्टीनम या रेल्वे स्थानकांवर थांबेल.