गोवा रिक्रूटमेंट सोसायटी कर्मचार्‍यांचा सोमवारी मोर्चा

0
65

मागण्या धसास लावण्यासाठी कृती
गोवा भरती रोजगार सोसायटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने गोवा रिक्रुटमेंट युनियन स्थापन केले असून मागण्या धसास लावण्यासाठी सोमवारी आल्तिनोवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेणार असल्याची माहिती या संघटनेचे नेते अजितसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.यापूर्वी कंत्राटी मजूर सोसायटी होती. ती रद्द करून सरकारने गोवा रिक्रुटमेन्ट सोसायटी स्थापन केली आहे. या सोसायटीमध्ये सुमारे १५०० उमेदवार असून सोसायटीतर्फे प्रत्येक उमेदवारामागे सराकर १३ हजार ४५० रुपये खर्च करते प्रत्यक्षात भरती सोसायटी निव्वळ वेतनातून कपात करून प्रत्येकी ४९०० रुपयेपर्यंत वितरीत करते. असे राणे यांनी सांगितले.
सर्व कर्मचार्‍यांना सेवेत नियमित करण्याची त्यांची मागणी आहे. सध्या वरील उमेदवारांना मानव संसाधन महामंडळात सामावून घेण्याचा सरकारच प्रयत्न करीत असल्याची त्यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे या उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.