गोवा राज्य मराठी व कोकणी चित्रपट महोत्सव एप्रिल २०१८मध्ये होणार असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ ह्या काळात बनवलेले चित्रपट ह्या महोत्सवासाठी निवडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
ज्या निर्मात्यांचे चित्रपट पूर्ण होण्याच्या वाटेवर आहेत त्यानी ते पूर्ण करावेत व सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घ्यावे व उपशिर्षके तयार करावीत. त्यानंतर त्यांना त्यांचे चित्रपट महोत्सवासाठी पाठवतात येईल, असे तालक यांनी सांगितले.
जास्तीत जास्त चित्रपट निर्मात्यांनी गोवा राज्य मराठी व कोकणी चित्रपट महोत्सवासाठी आपले चित्रपट पाठवावेत, असे आवाहन तालक यांनी यावेळी केले.
सिनेफाईलचे चित्रपट
प्रदर्शन १४पासून
ईएसजीच्या सिनेफाईल क्लबतर्फे दर गुरुवारी दाखवण्यात येणारे चित्रपट १४ डिसेंबरपासून दाखवण्यात येणार असल्याचेही तालक यांनी यावेळी सांगितले.
येणार्या वर्षीही गोवा मनोरंजन सोसायटीतर्फे विविध चित्रपट महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे तालक यांनी स्पष्ट केले.