येत्या विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्ष कॉंग्रेसशी युती करण्यास इच्छुक आहे मात्र मगोपशी युती करणार नसल्याचे मगोसोबत युतीचा विचार पक्षाने सोडून दिला असल्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी काल फोंडा येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
व्यंकटेश नाईक यांनी भाजपचा राजीनामा देऊन गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कांदोळकर बोलत होते. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत हेही उपस्थित होते.
यावेळी पत्रपरिषदेत कामत यांनी, आमच्या पक्षाची येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर युती करण्याची इच्छा आहे. मात्र त्यासाठी आम्ही कॉंग्रेसला कोणत्याही प्रकारचा आग्रह करणार नसल्याचे स्पष्ट केले.