गोवा प्रो लीगसाठी धेंपो संघाची घोषणा

0
214

धेंपो स्पोर्टस् क्लबने गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. त्यांनी १८ वर्षांखालील आपल्या तब्बल ११ खेळाडूंना मुख्य संघात स्थान दिले असून यात ३ अकादमी खेळाडूंचादेखील समावेश आहे.
हिरो एलिट लीग स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर रायन सौझा, कन्हैया कामटी, डॅरेल मास्कारेन्हस, नेसियो मारिस्टो फर्नांडिस, वेलांको एलिसन रॉड्रिगीस, मायरन फ्लावियानो फर्नांडिस, विनय हरजी, डॅन्सटन रँडेल फर्नांडिस, नायजेल फर्नांडिस, साईश बागकर व अमन गोवेकर यांना सीनियर संघात बढती मिळाली आहे. ‘ईगल्स’ म्हणून सुपरिचित असलेल्या धेंपो संघाने मेलरॉय फर्नांडिस, गौरव वायंगणकर व रिचर्ड कार्दोझ यांच्या रुपात तीन नवे खेळाडू अनुक्रमे एआरए एफसी, कळंगुट असोसिएशन व सेझा फुटबॉल अकादमीकडून संघात घेतले आहेत. प्रशिक्षण विभागात कोणताही बदल करण्यात आलेला नसून समीर नाईक, रिचर्ड सांचेझ व कामिलो गोन्साल्विस अनुक्रमे मुख्य प्रशिक्षक, सहायक-गोलरक्षण प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळतील. जेसन फर्नांडिस हे संघाचे फिजियोथेरपिस्ट असतील.

धेंपो संघ ः गोलरक्षक ः रायन सौझा, वेलिस्टर मेंडीस, मेलरॉय फर्नांडिस, बचावपटू ः एडविन व्हिएगस, कन्हैया कामटी, शॅलम पीरिस, शुभम मालवणकर, डॅरेल मास्कारेन्हस व गौरव वायंगणकर, मध्यरक्षक ः ऍरिस्टन कॉस्टा, सूरज हडकोणकर, कृतिकेश गडेकर, नेसियो मारिस्टो फर्नांडिस, वेलांको एलिसन रॉड्रिगीस, नीरज पारेख, मायरन फ्लावियानो फर्नांडिस, एल्बर गोन्साल्विस, विनय हरजी, रिचर्ड कार्दोझ, नायजेल फर्नांडिस, पेद्रो गोन्साल्विस, पृथ्वेष पेडणेकर, रजत हरिजन, डॅन्सटन रँडेल फर्नांडिस, डेस्मन परेरा, साईश बागकर, आघाडीपटू ः अमन गोवेकर, बीवन कॅरोल डिमेलो व लतेश मांद्रेकर.