गोवा पराभवाच्या छायेत

0
136

कचखाऊ फलंदाजीमुळे पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर राजस्थानविरुद्ध सुरू असलेल्या चार दिवशीय अंडर-१९ कूच बिहार क्रिकेट स्पर्धेत गोवा पराभवाच्या छायेत आहे. १६७ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना काल तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत गोव्याची स्थिती ८ बाद १२१ अशी झाली आहे. त्यांना विजयासाठी अजून ४६ धावांची गरज असून केवळ २ गडी बाकी आहेत.
एकवेळ गोव्याची स्थिती ८ बाद ९३ अशी झाली होती. परंतु शाणू वंतामुरी (नाबाद २९) आणि बालप्रीत सिंग (नाबाद ४) यांनी नवव्या विकेटसाठी २८ धावांची भागिदारी करीत गोव्याला काहीशा अशा दाखविल्या आहेत.

तत्पूर्वी दुसर्‍या दिवसाच्या २ बाद १४ धावांवरून पुुढे खेळताना काल राजस्थानचा दुसरा डाव १७८ धावांवर संपुष्टात आला. सुरज अहुजाने ११ चौकारांच्या सहाय्याने ९६ चेंडूत सर्वाधिक ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली. गोव्याचा फिरकीपटू राहुल मेहताने ६० धावांत ५ तर राहुल मेहताना ३ बळी मिळविले.
प्रत्युत्तरता १६७ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याची सुरुवात एकदम खराब झाली. राहुल मेहता आणि आलम खान झटपट तंबूत परतले. कर्णधार मंथन खुटकर आणि तनिश सावकर जास्त वेळ खेळपट्टीवर स्थिरावू शकले नाही. राजस्थानतर्फे संजय कुमार आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी ३ बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक ः राजस्थान, पहिला डाव, २४०.
गोवा, पहिला डाव ः २५२.
राजस्थान, दुसरा डाव ः (२ बाद १४ वरून पुढे) ६५ षट्‌कांत सर्वबाद १७८, (सुरज अहुजा ६९, कपिल बेनिवाल १८, अंशुल व दिव्य गजराज प्रत्येकी १७ धावा. बालप्रीत सिंग चड्ढा ५-६०, राहुल मेहता ३-३५, हृत्विक नाईक व शुभम बांदोडकर प्रत्येकी १ बळी).
गोवा, दुसरा डाव ः ४१ षट्‌कांत ८ बाद १२१, (राहुल मेहता १२, मंथन खुटकर २६, तनिश सावकर २३, शाणू वंतामुरी खेळत आहे २९, बालप्रीत सिंग चड्ढा खेळत आहे ४ धावा. संजय कुमार ३-१८, मानव सुतार ३-५०, अभिमन्यू माथुर १-२४ बळी).