गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोवा डेअरी) संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी येत्या १९ जून २०२२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळेत सहकार संकुल कुर्टी फोंडा येथे निवडणूक घेतली जाणार आहे.यासाठी निर्वाचन अधिकारी म्हणून सहकार खात्याचे अधिकारी राजू मगदूम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुकीसाठी २३ ते ३० मे या काळात सकाळी १० ते संध्याकाळी ४.३० यावेळेत सहकार संकुल कुर्टी येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३१ मे रोजी छाननी तर ३ जून रोजी उमेदवारांची यादी जाहीर होईल. ६ व ७ जून रोजी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. ८ रोजी अंतिम यादी जाहीर होईल. दि. २० जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.