गोवा क्रिकेट संघटनेतर्फे अंडर-१४ व १६ प्रशिक्षण शिबिर

0
110

गोवा क्रिकेट संघटनेतर्फे १४ आणि १६ वर्षांखालील मुलांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दक्षिण गोव्यातील अंडर-१४ मुलांसाठी बुधवार १० एप्रिल रोजी एमसीसी मैदानावर स. ८.३० वा.पासून निवड चांचणी होईल. तर उत्तर गोव्यातील मुलांसाठी गुरुवार ११ एप्रिल रोजी पर्वरीच्या जीसीए मैदानावर स. ८ वा.पासून निवड चांचणी घेण्यात येणार आहे. १ सप्टेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्यांना या निवड चांचणीत सहभागी होता येईल.

दक्षिण गोव्यातील अंडर-१६ मुलांसाठी बुधवार शुक्रवार १२ एप्रिल रोजी एमसीसी मैदानावर स. ८.३० वा.पासून निवड चांचणी होईल. तर उत्तर गोव्यातील मुलांसाठी शनिवार दि. १३ एप्रिल रोजी पर्वरीच्या जीसीए मैदानावर स. ८ वा.पासून निवड चांचणी घेण्यात येणार आहे. १ सप्टेंबर २००३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्यांना या निवड चांचणीत सहभागी होता येईल. खेळाडूंनी येताना जन्मदाखल्याची मूळ प्रत आणणे अत्यावश्यक आहे. अधिक माहितीसाठी उत्तर जिल्ह्यातील खेळाडंनी मोहन चोडणकर (पेडणे विभाग), विजय खोलमकर (डिचोली/सत्तरी विभाग), सुशांत नाईक (बार्देश विभाग) व जेतेंद्र शाह (तिसवाडी विभाग) यांच्याशी संपर्क साधावा. तर दक्षिण जिल्ह्यातील खेळाडूंनी यतीन कामुर्लीकर (मुरगाव विभाग), सय्यद अब्दुल मजिद (सासष्टी विभाग), मनोहर नाईक (केपे/कुडचडे/सांगे विभाग), शैलेंद्र नाईक (काणकोण विभाग).