>> समितीत १ वरिष्ठ उपाध्यक्ष, ५ उपाध्यक्ष, १४ सरचिटणीसांचा समावेश
गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाच्या नव्या समितीची घोषणा करण्यात आली असून, नवीन चेहर्यांची समितीवर वर्णी लावण्यात आली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कॉंग्रेस पक्षाच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर परिणाम झाला होता. तसेच कॉंग्रेस पक्षाचे संघटन कमकुवत झाले होते. या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेस पक्षाचे संघटन पुन्हा बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नवीन प्रदेश समितीची घोषणा करण्यात आली आहे.
या समितीवर १ वरिष्ठ उपाध्यक्ष, ५ उपाध्यक्ष, १४ सरचिटणीस आणि कार्यकारी समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी एम. के. शेख यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्ष म्हणून डॉ. प्रमोद साळगावकर, सुभाष फळदेसाई, तुलियो डिसोझा, सुनील कवठणकर आणि विठोबा देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून इव्हर्सन वालीस, कॅप्टन विरियातो फर्नांडिस, राजेश वेरेकर, मॉरेन रिबेलो, मनीषा उसगावकर, सावियो डिसोझा, प्रदीप नाईक, श्रीनिवास खलप, जितेंद्र गावकर, जोसेफ वाझ, विजय भिके, वरद म्हार्दोळकर, अर्चित नाईक व रॉयला फर्नांडिस यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारी समितीमध्ये आल्तिनो गोम्स, बाबी बागकर, गुरुदास नाटेकर, एल्विस गोम्स, कार्लूस आल्मेदा, विकास प्रभुदेसाई, नितीन चोपडेकर, मेघश्याम राऊत, निझार बेग, शंभू बांदेकर, सुनीता वेरेकर, धर्मा चोडणकर, सुरेंद्र फुर्तादो, प्रदीप देसाई यांची निवड केली आहे.
राजकीय व्यवहार समितीमध्ये दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विधिमंडळ नेते आमदार युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दिन, एदुआर्द फालेरो, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, रमाकांत खलप, गिरीश चोडणकर, कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि बीना नाईक यांचा समावेश आहे. प्रसार माध्यम विभागाच्या अध्यक्षपदी अमरनाथ पणजीकर आणि खजिनदार म्हणून आर्विले दोरादो यांची नियुक्ती करण्यात आली आहे.