ठाणे डोंगुर्ली पंचायतीतील गोळावली सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेचे काम सुरू असलेली इमारत कोसळली. त्यामुळे त्या ठिकाणी काम करीत असलेला मलप्पा (५५) राहणार बेल्लारी हा गंभीर जखमी झाला. त्याच्या दोन्ही पायाला जबर दुखापत झाली आहे. त्या विद्यालयाच्या इमारतीचे काम गेले काही दिवस सुरू होते. इमारतीच्या एका भिंतीचे काम करण्यात आले होते तर दुसर्या बाजुच्या भिंतीचे काम सुरू होते. काल सायंकाळी ४.३० वा. काम सुरू असलेली भिंत कोसळली व मलप्पा हा भिंती खाली सापडला व त्यात तो गंभीर जखमी झाला. त्या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती न करता ती नवीन बांधावी अशी मागणी नागरिक करीत होते पण नागरिकांचे म्हणणे न ऐकता इमारतीची दुरुस्ती करण्यात येत होती.