गोमेकॉ डीनपदी डॉ. प्रदीप नाईक

0
127

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जिंदाल काल सेवेतून मुक्त झाले. त्यांच्या जागी महाविद्यालयाचे नवे डीन म्हणून नेत्ररुग्ण चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप नाईक यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. जिंदाल यांना दोन वर्षे सेवावाढ दिली होती. त्यांनी गोमंतकीय जनतेने आपल्याला दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सेवेतून मुक्त झालो तरी आपल्या या ज्ञानाचा फायदा गोमंतकीयांना देण्यासाठी सदैव तयार असेल, असे त्यांनी सांगितले.