बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ५ रुग्णांना काल दाखल करण्यात आले असून कोरोना वॉर्डात कोरोना १८ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गोमेकॉच्या प्रयोगशाळेत ४८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. अहवाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. आरोग्य खात्याकडे घरी विलगीकरणासाठी १८ जणांनी काल नोंदणी केली आहे. घरी विलगीकरणासाठी नोंदणी केलेल्यांची एकूण संख्या १२८० वर पोहोचली आहे.
कोरोना संशयितांच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना मडगाव रेसिडेन्सी, ओल्ड गोवा रेसिडेन्सीमध्ये ५जण, फोंडा उप जिल्हा हॉस्पिटलमध्ये ६, चिंचिणी उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये एकाला क्वारंटाईऩ करून ठेवण्यात आले आहे.