गोमेकॉत रुग्णांच्या तपासणीसाठी सर्व उपकरणे उपलब्ध : विश्वजित

0
9

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील रेडिओलॉजी विभागात एक्स रे, सीटी स्कॅन, पॅट स्कॅन, एनएमआर अशी रुग्णांची तपासणी करण्यासाठीची सर्व उपकरणे उपलब्ध असून फक्त मेमोग्राफी करण्यासाठीचे उपकरण तेवढे उपलब्ध नसल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा विधानसभेत
दिली.

प्रश्नोत्तराच्या तासाला मंत्री क्रुझ सिल्वा यांनी तत्‌‍संबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. मेमोग्राफीसाठीचे मशीन बिघडले असून त्यामुळे नवे मशीन खरेदी करण्यासाठी ऑर्डर देण्यात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोमेकॉच्या रेडिओलॉजी विभागात अन्य सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे तेथे तपासणीसाठी जाणाऱ्या रुग्णांची कोणतीही गैरसोय होत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे बोलताना राणे म्हणाले की, एमआरआयसाठी गोमेकॉत रोज 10 ते 15 रुग्ण येत असतात. एका रुग्णांचा एमआरआयसाठी सुमारे 30 ते 40 मिनिटे लागतात. त्यामुळे आम्ही कधी कधी काही रुग्णांना ‘रेडिएंट डायोग्नोस्टिक्स’ या खासगी केंद्रात रुग्णांना पाठवत असतो. मात्र, तेथे पाठवल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त नाही. गेल्या 5 वर्षांत फक्त 350 रुग्णांना तेथे पाठवण्यात आले असल्याची माहिती राणे यांनी दिली.

रेडिएंटकडे पाठवल्या जाणाऱ्या रुग्णांचे पैसे सरकार फेडते की ते रुग्णांना फेडावे लागतात असा प्रश्न क्रुझ सिल्वा यांनी केला असता राणे या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. गोमेकॉच्या रेडिओलॉजी विभागात सगळी व्यवस्था असून त्यामुळे तेथे जाणाऱ्या रुग्णांची कसलीही गैरसोय होत नसल्याचा दावा यावेळी राणे यांनी केला. एखाद्या रुग्णांची गैरसोय झाली असेल तर मग त्या रुग्णाचे नाव द्या, असे राणे यांनी यावेळी सिल्वा यांना सांगितले.
यावेळी हस्तक्षेप करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, गोमेकॉच्या कॅज्युएलटी विभागावर प्रचंड ताण असतो. काहीवेळा तेथे न्युरॉलॉजिस्ट तज्ज्ञांची उणीव भासत असते.

पॅट स्कॅन मशिनची सोय

यावेळी राणे हे म्हणाले की, गोमेकॉत पॅट स्कॅन मशिनचीही सोय आहे.र्करोगाचे पहिल्याच टप्प्यात निदान होण्यासाठी या मशिनचा फायदा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय गोमेकॉत स्टॅमी प्रोग्रामचीही सोय असून अशी सोय सरकारी इस्पितळात सुरू करून दिलेले गोवा हे पहिले राज्य आहे. गोमेकॉत आता कॉयलिंगचीही सुविधा उपलब्ध असून ही सुविधा जगात कुठेही मोफत उपलब्ध नसल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दली.

मेमोग्राफीसाठी नवे मशीन घेणार

मेमोग्राफीसाठीचे मशीन बिघडले असून त्यामुळे नवे मशीन खरेदी करण्यासाठी ऑर्डर देण्यात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोमेकॉच्या रेडिओलॉजी विभागात अन्य सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे तेथे तपासणीसाठी जाणाऱ्या रुग्णांची कोणतीही गैरसोय होत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.