गोमेकॉत दोन महिन्यांत एआय ॲप ः राणे

0
1

>> रक्ताच्या अहवालासोबतच आजाराचेही होणार निदान

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये आगामी दोन महिन्यात एआय ॲप उपलब्ध केले जाणार आहे. या ॲपमुळे रक्ताचा अहवाल अपलोड करताच आजाराचे निदान होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स संकल्पना राबवणारे गोवा हे पहिले राज्य ठरणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आल्तिनो येथे वनभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काल सांगितले.

गोमेकॉमध्ये नवीन सुधारणा केल्या जात आहेत. वरिष्ठ डॉक्टरांची बैठक घेऊन सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील दोन्ही जिल्हा इस्पितळांमध्ये टेली आयसीयू संकल्पना राबविण्यात येणार आहे. एआय ॲप विविध अंगांनी रुग्णांना फायदेशीर ठरणार आहे, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

गोमेकॉत विविध सुविधा
स्ट्रोक येणाऱ्या रुग्णांसाठी गोमेकॉमध्ये खास सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गोमेकॉतील वेगवेगळ्या विभागांचे सुपर स्पेशालिटी विभागांमध्ये स्थलांतर केले जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत कर्करोग रुग्णांसाठी खास प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे. सध्या दोन कॅथलॅब गोमेकॉमध्ये कार्यरत असून त्यात आणखी एका कॅथलॅबची भर पडणार आहे, असे ते म्हणाले. .ही मंत्री राणे यांनी सांगितले. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात प्रस्तावित खासगी वैद्यकीय महाविद्यालय सरकारने तूर्त वगळल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

नगरपालिका ऑनलाईन

राज्यातील सर्व नगरपालिकांचा कारभार येत्या 15 दिवसांत ऑनलाईन करण्यात येणार आहे. नगरपालिकांनी प्रलंबित निधीचा वापर करण्याचा निर्देश देण्यात आल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.