गोमेकॉत ट्रान्फॉर्मर जळाल्याने विजेअभावी तारांबळ

0
111

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील विजेचा ट्रान्स्फॉर्मर जळाल्याने इस्पितळातील सर्व व्यवहार ठप्प झाले. काल दुसर्‍या दिवशी उशीरा रात्री दुरुस्ती करून सर्व व्यवहार सुरळीत करण्यात यश आले. अखेरत्याचा रुग्णांना बराच त्रास झाल्याचे वृत्त आहे.
वरील प्रकारामुळे इस्पितळातील अधिकार्‍यांची तारांबळ उडाली आहे. रक्त चांचण्या तसेच महत्वाच्या शस्त्रक्रियाही करणे शक्य झाले नाही. वीज पुरवठा बंद झाल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. गेले काही दिवस गोमेकॉत पणीपुरवठ्यावरही परिणाम झाला असून रुग्णांची परवड होत आहे.