गोमेकॉत कोरोना संशयित आणखी १० रुग्ण दाखल

0
137

 

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या कोरोना खास वॉर्डात संशयित १० रुग्णांना काल दाखल करण्यात आले असून कोरोना वॉर्डात कोरोना  ३२ संशयित  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संशयितांच्या ६४ नमुन्यापैकी १५ अहवाल नकारात्मक आले आहेत. ४९ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

मडगाव येथील ईएसआय इस्पितळात ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  आरोग्य खात्याकडे घरी विलगीकरणासाठी ३० जणांनी काल नोंदणी केली आहे. घरी विलगीकरणासाठी नोंदणी केलेल्यांची एकूण संख्या ९४२ वर पोहोचली  आहे.  कोरोना रुग्णांच्या संपर्कातील १२ जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहेत. क्वारंटाईऩ केलेल्याची संख्या १५७ एवढी झाली आहे.

कोरोना संशयितांच्या संपर्कात आलेल्या ४७ जणांना क्वारंटाईऩ करून  ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.