गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ३ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे. कोरोना वॉर्डात कोरोना २७ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना संशयितांच्या ६३ नमुन्यांपैकी ६२ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. एका नमुन्याचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
मडगाव येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये ५ कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याकडे घरी विलगीकरणासाठी १९ जणांनी काल नोंदणी केली आहे. घरी विलगीकरणासाठी नोंदणी केलेल्यांची एकूण संख्या ९६१ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील ११ जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहेत. कोरोना संशयितांच्या संपर्कात आलेल्या ४९ जणांना मडगाव रेसिडेन्सी, ओल्ड गोवा रेसिडेन्सीमध्ये १८, फोंडा उपजिल्हा हॉस्पिटमध्ये ६, उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये २, मये रेसिडेन्सीमध्ये १७, चिंचिणी उपजिल्हा हॉस्पिटलमध्य २ जणांना क्वारंटाईऩ करून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.