गोमेकॉतून खासगी रक्त तपासणीस पाठविण्याची चौकशी

0
136

प्रयोगशाळा सहायक निलंबित
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत रक्त चाचणीसाठी येणार्‍या रुग्णांना परस्पररित्या खाजगी प्रयोगशाळेत पाठविल्याप्रकरणी सरकारने प्रयोगशाळा सहाय्यक रवी सावंत यांना निलंबित करून चौकशी सुरू केली आहे.
गेल्या बर्‍याच काळापासून गोमेकॉमध्ये वरील प्रकार चालू होते. एका वृत्तवाहिनीने या प्रकाराचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून ते प्रक्षेपित केल्याने प्रचंड खळबळ निर्माण झाली. आरोग्य खात्याने त्याची गंभीर दखल घेऊन सावंत यांना निलंबित करून चौकशी करण्याचा आदेश दिला. सावंत यांची चौकशी सुरू केल्याने आणखी काहीजण अडचणीत येण्याची शक्यता आहे.