गोमेकॉतील रुग्णांच्या परवडीचे विधानसभेत पडसाद

0
97

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याअभावी रुग्णांचे हाल झाल्याचे तीव्र पडसाद काल विधानसभेत उमटले. इस्पितळात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक दुःखी असतात. अशाप्रसंगी डॉक्टरांनी पेचप्रसंग निर्माण करू नयेत, असे आवाहन आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल डॉक्टरांना केले. पाणी पुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे इस्पितळाला पाणीपुरवठा झाला नाही. त्यावर तोडगा काढला असून मोठी जलवाहिनी घालण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.