बिगर गोमंतकीय वन अधिकार्यांना गोव्याच्या वनक्षेत्राविषयीची माहिती नाही. त्यामुळे ते वनक्षेत्रात न जाता कार्यालयातच बसून राहणे पसंत करतात. त्यामुळे जे गोमंतकीय वन अधिकारी आहेत त्यांच्याकडे जास्त जबाबदारी द्यावी लागेल. खास करून जे रेंज फॉरेस्टर ऑफिसर आहेत त्यांच्याकडे जबाबदारी देण्याची गरज आहे, असे मगो पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल प्रतिक्रया देताना सांगितले. वाघांची हत्या केलेल्यांवर कठोर कारवाई केली जाण्याची त्यांनी मागणी केली.