विदेशी जहाजावरील एका गोमंतकीय खलाशाचा मृत्यू

0
124

जहाजावर अडकलेल्या गोव्याच्या खलाशांपैकी मार्ले-बोर्डा-मडगांव येथील ग्लेन पेरैरा (वय ३३) याचा काल मृत्यू झाला. तो स्पेनमधील कॉस्ता व्हिक्टोरिया या जहाजावर काम करीत होता. त्याचा मृत्यू कोरोनामुळे की अन्य कारणामुळे हे समजू शकले नाही.

मृत्यूच्या आदल्या दिवशी आपल्या कुटुबियांशी बोलताना सर्दीचा त्रास होत असल्याचे त्याने सांगितले होते. त्याच्या पश्चात आई, भाऊ व बहिण असा परिवार आहे.

सरदेसाईंची सरकारवर टीका

सरकारचे सर्व निर्णय आत्मघातकी असून सरकार स्वतः बरोबर गोव्यातील लोकांना घेऊन बुडेल अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी या संदर्भात केली आहे. आत्मघातकी निर्णय घेण्यापासून सरकारला रोखण्यापासून आपण विविध पक्षांतील तज्ज्ञांना एकत्र आणून एक थिंक टँक बनविणार आहे. साथीशी झुंजण्यासाठी सरकार घेत असलेला निर्णय चिंताजनक आहेत. बोटीवर अडकलेल्या गोमंतकियांना परत आणण्यासाठी पोकळ आश्‍वासने सरकार देते असे ते म्हणाले.