गोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप

0
43

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव मयेकर यांचे पार्थिव त्यांच्या गणेशपुरी म्हापसा येथील रविबिंब या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार सुभाष शिरोडकर, माजी आमदार धर्मा चोडणकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर, संजय हरमलकर, गो. रा. ढवळीकर, मराठी भाषा चळवळीतील अनेक कार्यकर्ते, म. गो. पक्षाचे कार्यकर्ते, शिक्षक, माजी विद्यार्थी, साहित्यिक यांनी श्रद्धांजली वाहिली.

दत्तवाडी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र राजेंद्र व शैलेंद्र यांनी मंत्राग्नी दिला. त्यावेळी मयेकर यांच्या कन्या डॉ. रेश्मा व मयेकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील कोणीही मत्र्यांनी उपस्थिती दर्शवली नाही त्यामुळे मयेकर सरांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली,