गेल्या २४ तासांत राज्यात १.७७ इंच पावसाची नोंद

0
170

राज्यात मागील चोवीस तासात १.७७ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे जोरदार वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत उद्या शनिवार ४ जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मागील चोवीस तासांत ओल्ड गोवा येथे सर्वाधिक २.८१ इंच पावसाची नोंद झाली.