राज्यात मागील चोवीस तासांत नवीन २ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आणखी कोरोना बळींची नोंद झाली नाही. राज्यातील कोरोनाबाधित सक्रिय रूग्णसंख्या २९ एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ६१० स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३० एवढी आहे. राज्यात मागील चोवीस तासांत आणखी २ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४३ टक्के एवढे आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत एकाही नवीन कोरोनाबाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आलेले नाही.