गॅसवरील अनुदानासाठी बँक खाते असणे पुरेसे

0
81

स्वयंपाकाच्या गॅसच्या अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार क्रमांक सक्तीचा नसल्याचे सरकारने काल जाहीर केले. केवळ बँक खात्याचा तपशील पुरवला, तरीही हे अनुदान खात्यात जमा होईल असे सरकारने स्पष्ट केले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत हे स्पष्टीकरण दिले. पहिला सिलिंडर बाजारभावाने घेता यावा यासाठी अनुदान थेट हस्तांतरण योजनेत जोडल्या जाणार्‍या ग्राहकांना एकवेळची आगाऊ रक्कम खात्यात जमा केली जाते असेही प्रधान यांनी सांगितले. शिवाय पहिल्या सिलिंडरसह प्रत्येक सिलिंडरव अनुदान बँक खात्यात जमा होत असते असेही प्रधान यांनी सांगितले.ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा लोकांनी आपल्या गॅस पुरवठादाराला आपल्या बँक खात्याचा तपशील पुरवला तरीही सिलिंडरवरील अनुदान त्याच्या खात्यात जमा होईल असे त्यांनी पुढे सांगितले.