मेरशी
येथील वाहनपेंटर महेश भिकारो नाईक यांच्या गॅरेजवर एकाच वेळी झाड व माड पडल्याने त्यांच्या गॅरेजची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यावेळी गॅरजमध्ये वाहने तसेच सुदैवाने कामगार बाहेर होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी लगेच दाखल झाले. त्यांनी झाड व माड कापून गॅरेजमधील इतर सामानाचे संरक्षण केले. मात्र, या दुर्घटनेत श्री. नाईक यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. या दुर्घटनेवेळी शेजारी तसेच पंचायत सदस्य वॉल्टर यांनी त्वरित धाव घेऊन मदत केली.