गृह निर्माण क्षेत्रासाठी २५ हजार कोटींचा निधी

0
145

>> निर्मला सीतारमण यांची घोषणा

केंद्र सरकारने गृह निर्माण क्षेत्राला आर्थिक उभारी देण्यासाठी २५ हजार कोटी रुपयांची पॅकेज जाहीर केली आहे. नाजूक आर्थिक स्थितीमुळे रखडलेल्या १६०० गृह निर्माण प्रकल्पांना चालना देण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचे या संदर्भात घोषणा करताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले. यामुळे रोजगारात वाढ होण्यासह सिमेंट, लोखंड, पोलाद यांना मागणी वाढणार असल्याचे त्या म्हणाल्या.
१६०० प्रकल्पांमधून ४.५८ लाख घरे उभाराली जाणार आहेत. या क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकार १०,००० कोटी रुपये निधी उपलब्ध करणार आहे. तर उर्वरीत १५,००० कोटी रुपयांचा निधी भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) व भारतीय स्टेट बँक (एसबीआय) तसेच अन्य संस्था यांच्यामार्फत उपलब्ध केला जाणार आहे. तसेच या क्षेत्रात पेंशन फंडकडूनही गुंतवणूक केली जाणार आहे.
निधी कमतरतेमुळे रखडलेले परवडण्यायोग्य व मध्यम उत्पन्न गटांसाठीचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार हा निधी उपलब्ध करणार आहे.