‘गृह आधार’ साठी हयात असल्याचे दाखले अनिवार्य

0
110

गृह आधार योजनेचा लाभ घेणार्‍यांनी दि. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या ३० दिवसांच्या काळात हयात असल्यासंबंधीचे पत्र महिला आणि बाल कल्याण खात्याच्या संबंधित तालुका कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन संचालक विकास गावणेकर यांनी केले आहे. वरील पत्रे १ ऑक्टोबरपूर्वी सादर करू नयेत असेही सूचित केले आहे. हयात असल्यासंबंधीचे पत्र सादर न केल्यास संबंधितांना मिळणारे आर्थिक सहाय्य बंद केले जाईल. त्याचप्रमाणे थकबाकीही दिली जाणार नाही, असे गावणेकर यांनी सांगितले. या योजनेखाली आतापर्यंत १ लाख १३ हजार जणांना लाभ मिळतो. त्यामुळे महिन्याकाठी १४ कोटी रुपये खर्च केले जातात. अजून १२०० अर्ज प्रलंबित असून ते डिसेंबर अखेरपर्यंत मंजूर केले जातील. अशी माहिती गावणेकर यांनी दिली. या योजनेसाठी सरकारने १३५ कोटी रुपये मंजूर केले होते. आणखी २० कोटींची गरज असल्याने या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकार निधीची अडचण भासू देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.