गृह आधार योजनेअंतर्गत बँक खात्यात बदल

0
117

पणजी
भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार म्हापसा अर्बन सहकारी बँकेत गृह आधार योजनेचे मासिक वेतन स्वीकारले जात नसल्याने या बँकेतील लाभार्थींच्या खात्यात मासिक वेतन जमा होऊ शकत नाही, असे महिला आणि बालविकास संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे म्हापा अर्बन सहकारी बँकेत खाते असलेल्या सर्व गृह आधार योजनेच्या लाभार्थींनी इतर कोणतीही बँक निवडून बँकेचा तपशील त्वरित जीईएलकडे सादर करावा. तसेच लाभार्थींनी श्रमशक्ती भवन, पाटो पणजी येथील गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडे (जीईएल) सादर केलेल्या बँक खात्याशी त्यांचा आधार क्रमांक जोडावा अशी विनंती करण्यात आली आहे.