सप्टेंबरपर्यंतचा ‘गृह आधार’ योजनेंतर्गतचा निधी प्रत्येकी रु.१२०० प्रमाणे १ लाख १५ हजार ८०४ खात्यांत जमा करण्यात आला असल्याचे महिला आणि बाल विकास खात्याकडून सांगण्यात आले. एकूण रु. १३ कोटी जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही लाभार्थींनी चुकीचा खातेक्रमांक दिल्याने त्यांना रक्कम मिळू शकली नव्हती, अशांपैकी ज्यांनी आवश्यक दुरुस्ती कळविली होती, त्यांचे पैसेही जमा करण्यात आले आहेत. लाभार्थींनी आपापले बँक खाते तपासावे व पुढील १० दिवसांपर्यंत पैसे जमा झाले नसल्यास २४३८८४४ किंवा ८५५१८३३९३३ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.