गृहमंत्री अमित शहा पुन्हा रुग्णालयात

0
124

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सोमवारी रात्री पुन्हा एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. अमित शाह यांच्यावर रुग्णालयात एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरीया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून आहे. अमित शाह यांची प्रकृती ठीक आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून कोरोनाबाधित असल्याचे सांगितले होते.